तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक मंदिरात येत असतात. तिरुपतीचं बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple) हे जागृत देवस्थान आहे. तिरुपती बालाजी मंदिरात बुधवारी (८ जानेवारी) एक खळबळजनक घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh) प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी (Tirupati stampede) झाल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे.
Tirupati stampede | Andhra Pradesh Chief Minister N Chandrababu Naidu will visit Tirupati tomorrow morning to meet the injured.
Four people have lost their lives in the stampede. https://t.co/0n2cuRLYjJ
— ANI (@ANI) January 8, 2025
सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकन मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेत उभे होते. या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क येथे पास घेण्यासाठी रांगेत उभं राहण्यास सांगितलं गेलं तेव्हा ही चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये सहा भाविकांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरीत अनेक भाविक आजारी पडले, काहीजण बेशुद्धही पडल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिरुपती देवस्थान समितीने १०, ११ आणि १२ जानेवारी रोजी वैकुंठद्वार दर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांसाठी १.२० लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला होता. (Tirupati stampede)
हेही वाचा-रुग्ण केंद्रीत आरोग्य व्यवस्था निर्माण करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
चेंगराचेंगरीनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. त्यात सहा भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये मल्लिका नावाच्या एका महिलेचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिरुपती पोलिसांनी प्रयत्न केले. त्यांनी थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रणही मिळवलं. (Tirupati stampede)
हेही वाचा-Bangladesh infiltrator यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांचा मुळावर घाव
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत कार्य करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील. (Tirupati stampede)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community