तिरुपती मंदिराच्या (Tirupati Temple) प्रशासकीय मंडळाने तिरुपती तिरुपती देवस्थानातील १८ गैर हिंदू (Hindu) कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना अन्य सरकारी विभागामध्ये ट्रान्सफर घेण्यास किंवा स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना (VRS) स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. बोर्डाने स्पष्ट केले की, हा निर्णय मंदिरांच्या आणि धार्मिक कार्यांच्या आध्यात्मिक पवित्रतेचे रक्षण करण्याच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे.
( हेही वाचा : एस. टी. भाडेवाढ अपरिहार्य; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांची माहिती)
तिरुपती देवस्थानातील सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमात हे गैर हिंदू (Non-Hindu) कर्मचारी सहभागी होत असल्याचे आढळले होते. त्यामुळे या १८ कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. आदेशात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या (Sri Venkateswara Balaji Mandir) पवित्रतेच्या रक्षणासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
यासंदर्भात देवस्थान बोर्डाचे चेअरमन बी.आर.नायडू (B.R. Naidu) यांनी सांगितले की, मंदिराच्या पावित्र्याला प्राधान्य देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांना अन्य सरकारी विभागांमध्ये ट्रान्सफर करण्याचा किंवा व्हीआरएसच्या माध्यमातून सेवानिवृत्त करण्याचा संकल्प केला आहे, असे नायडू म्हणाले. (Hindu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community