ठाणे महापालिकेच्यावतीने प्लॅस्टीक बंदी कारवाई अंतर्गत २३७ किलो प्लॅस्टिक जप्त

94

प्लॅस्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार, महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लॅस्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अकस्मात धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये सुमारे २३७ किलो प्लॅस्टिक जप्त करून ६६ हजार ४००रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र अविघटनशील कचरा ( नियंत्रण ) कायदा २००६ अंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे प्लॅस्टीक व थर्माकोल इत्यादीपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तुंचे ( उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणुक ) वर बंदी घालण्यात आली आहे. तथापि ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदर बंदी मोडून प्लॅस्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर अकस्मात धडक कारवाई करण्यात आली.

( हेही वाचा शाळा भरताना आवडीने म्हटली जाणारी ‘प्रतिज्ञा’ कोणी लिहिली माहितीय का? )

237 किलो वजनाचे प्लॅस्टिक जप्त 

सदर मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लॅस्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण २३७ किलो वजनाचे प्लॅस्टिक जप्त करून ६६ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त मनीष जोशी व आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेच्या ९ प्रभाग समितीमधील स्वच्छता निरीक्षक तसेच विभागातील कर्मचारी आदींनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.