Waqf property ला हात लावणाऱ्यांचे डोळे काढू आणि हात तोडू; ममतादीदींच्या खासदाराची भरसभेत धमकी

91
Waqf property ला हात लावणाऱ्यांचे डोळे काढू आणि हात तोडू; ममतादीदींच्या खासदाराची भरसभेत धमकी
Waqf property ला हात लावणाऱ्यांचे डोळे काढू आणि हात तोडू; ममतादीदींच्या खासदाराची भरसभेत धमकी

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध सुरू असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदर (Bapi Halder) यांनी एक वादग्रस्तव विधान केले आहे. दक्षिण २४ परगणा येथील एका जाहीर सभेदरम्यान, हलदर यांनी वक्फ मालमत्तेवर नजर ठेवणाऱ्यांचे डोळे फोडून टाकू आणि हात तोडू, अशी धमकी दिली. (Waqf property)

( हेही वाचा : Ambedkar Jayanti 2025 : धर्म, धर्मनिरपेक्षता आणि Constitution !

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपा अध्यक्ष सुकांत मजुमदार (Sukant Majumdar) यांनी हलदर (Bapi Halder) यांच्यावर कारवाईची मागणी केली आणि निदर्शकांना “कट्टरपंथी जिहादी गट” असे संबोधले. त्यांनी असा दावा केला की, हे लोक हिंदूंविरुद्ध (Hindu) हिंसाचार करत होते आणि बीएसएफ जवानांवर पेट्रोल बॉम्ब फेकत होते. मजुमदार यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावरही निशाणा साधला. हे ममता बॅनर्जींचे (Mamata Banerjee) अपयश आहे, असेही त्यांनी म्हटले. भाजपाने याला तृणमूलच्या हिंदूविरोधी धोरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही, अशीही माहिती समोर आली आहे. (Waqf property)

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.