पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर मेडिकल कॉलेजच्या कनिष्ठ डॉक्टरांनी संप पुकारला. तृणमूल (TMC) छात्र परिषदेचे (टीएमसीपी) नेते मुस्तफिजूर रहमान मलिक यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या छळवणुकीविरोधात डॉक्टरांनी हे आंदोलन सुरू केले.
आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या निकटवर्तीय तृणमूल (TMC) छात्र परिषदेचे मुस्तफिजूरवर रॅगिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. त्याने कनिष्ठ महिला डॉक्टरांना आयटम साँगवर डान्स करण्यास भाग पाडले. महंमद सीबी नावाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुस्तफिजूरने मेदिनीपूर मेडिकल कॉलेजमधून ३ वर्षांपूर्वी पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण करूनही तो येथेच वसतिगृहात राहतो. मोहम्मद म्हणाला, “तो आम्हाला त्रास देत आहे आणि कनिष्ठ डॉक्टरांना वसतिगृहातून हाकलून देण्याची धमकी देत आहे. जेव्हा आम्ही मुस्तफिझूरला सांगितले की, आम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करू, तेव्हा तो आम्हाला जरी तुम्ही तक्रार आरोग्य विभागाकडे केली तरी ते काहीच करू शकत नाही.
मुस्तफिजूर जबरदस्तीने डॉक्टरांना तृणमूल (TMC) छात्र परिषदेत आणायचा
मोहम्मदने सांगितले की, मुस्तफिजूरने ज्युनियर डॉक्टरांना नोंदणी प्रमाणपत्रे न मिळण्याची धमकी दिली आहे. हा माणूस परीक्षेला कोण बसणार आणि कोण उत्तीर्ण होणार आणि कोण नापास या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. मुस्तफिजूरने प्रत्येक कनिष्ठ डॉक्टरांकडून 2000 रुपये गोळा केले आणि त्यांना जबरदस्तीने तृणमूल (TMC) छात्र परिषदेत समाविष्ट केले. आंदोलक डॉक्टरांनी सांगितले की, मुस्तफिजूर एक सिंडिकेट चालवतो आणि मेदिनीपूर मेडिकल कॉलेजमध्ये सर्वकाही नियंत्रित ठेवतो. श्रेया मंडल हिने सांगितले की, “आम्ही या महाविद्यालयात प्रवेश घेतला, त्याच दिवशी शिक्षक वर्ग सोडून गेले होते आणि विद्यार्थी वर्गात होते, तेव्हा या युनिटने येऊन आमचे दरवाजे बंद केले आणि या मुस्तफिजूरचे गुंड इथे घुसून आमची रॅगिंग केली.
Join Our WhatsApp Community