विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांमध्ये मराठी अनिवार्य करा,विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचा ठराव . गेल्या काही वर्षांत शैक्षणिक आणि सामाजिक जीवनात मातृभाषेकडे दुर्लक्ष केेल जात आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकवण्यासाठी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आला. विद्यापीठ स्तरावर असा ठराव करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune Vidyapeeth) हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे.
मराठी ही ज्ञानभाषा, उद्योगाची आणि रोजगाराची भाषा होण्यासाठी विद्यापीठीय स्तरावर शिकवल्या जाणाऱ्या सर्व विद्याशाखेत मराठी हा विषय अनिवार्य करण्यात यावी असा महत्वाचा ठराव करण्यात आला आहे. अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास मंडळाची बैठक विद्यापीठात झाली. या बैठकीला अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे, सदस्य डॉ. सुधाकर शेलार, डॉ. प्रमोद आंबेकर, डॉ. शांताराम चौधरी, डॉ. पोर्णिमा घोडके, डॉ. सुरेश जाधव, राजीव बर्वे, डॉ. शीतल गोर्डे पाटील, डॉ. शोभा तितर, संजय ऐलवाड आदी उपस्थित होते. मराठी भाषेची व्याप्ती वाढवण्यासाठी महाविद्यालयीन, विद्यापीठ स्तरावरील प्रत्येक विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना मराठी शिकवली जावी. त्यामुळे ती ज्ञानभाषा होण्यासह व्यवसायाची, उद्योगाची भाषा होण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर सर्व विद्याशाखांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.
(हेही वाचा : UIDAI : आधार अपडेट साठी आता २४/७ ‘टोल-फ्री हेल्पलाइन’)
अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. तसेच तत्कालीन पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेसाठी झाली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व विद्याशाखांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा ठराव करण्यात आला. हा ठराव करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यातील पहिलेच आहे. सर्व विद्याशाखांमध्ये मराठी शिकवल्यास मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल. तसेच मराठी भाषेत पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. केलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. मराठी अनिवार्य करण्याच्या मागणीसाठी कुलगुरूंसह राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community