सिगारेटमुळे कोरोना संसर्गापासून रक्षण होते! तंबाखू व्यापाऱ्यांचा न्यायालयात दावा

धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात होतो, असे तंबाखू उत्पादकांनी मुंबई उच्च न्यायालयात म्हटले आहे.

सिगारेटमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही, त्यातील निकोटीनमुळे कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रक्षण होते, तसा अहवाल उपलब्ध आहे, असा दावा मुंबई बिडी तंबाखू व्यापारी संघ आणि फेडरेशन ऑफ रिटेलर असोसिएशन यांनीं मुंबई उच्चं न्यायालयात केला आहे.

कोरोना काळात सिगारेट, बिडीवर तात्पुरती बंदी आणावी! – न्यायालय 

कोरोनासंबंधी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये तंबाखू व्यापाऱ्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. एप्रिल २०२१ यावेळी या सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सिगारेट आणि बिडी यावर कोरोना काळापर्यंत तात्पुरती बंदी आणावी, असा आदेश दिला. कारण सिगारेट आणि बिडी हे कोरोना संसर्गाला कारणीभूत आहे, असेही न्यायालयाने म्हटले होते.

(हेही वाचा : मराठा आरक्षणावरील केंद्राची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)

धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका! – सरकार 

त्यावर महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात अहवाल दिला, त्यामध्ये टाटा मेमोरियल सेंटर आणि ऑटोमिक एनर्जी डिपार्टमेंट यांच्या अहवालातून धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाची लागण होते, असे म्हटले आहे. त्यांनी यासोबत अन्य चाचणी अहवाल सादर केले. ज्यामध्ये धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे, असे म्हटले आहे.

धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी! – तंबाखू उत्पादक 

यावेळी तंबाखू व्यापाऱ्यांच्या वतीने वकील रवी कदम यांनी याविषयी वेगळा युक्तीवाद केला. त्यासाठी त्यांनी कॉउंसिल फॉर सायन्स अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) चा अहवाल सादर केला. त्यामध्ये धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात होतो, असे म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने विषय वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे आणि सीएसआयआरमध्ये कुणीही वॆद्यकीय तज्ज्ञ नाही, असे नमूद केले. तरीही न्यायालयाने ही हस्तक्षेप याचिका स्वीकारली असून त्यावर ८ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here