मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) दृष्टीकोनातून मराठा समाजासाठी आज महत्वाचा दिवस आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर बुधवारी (६ डिसेंबर ) पहिली सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. (Maratha Reservation)
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. सुनावणीत युक्तिवाद होणार नाही. तर फक्त दालनात केस पुढे चालवायची की नाही याचा निर्णय होईल. यासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि 3 न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. (Maratha Reservation)
क्युरेटिव्ह पिटीशनवर पहिली सुनावणी
मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटीशनवर पहिली सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीकडे मराठा समाजासह राज्याचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण 5 मे 2021 रोजी रद्द केलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी राज्य सरकारने ही याचिका दाखल केली आहे.
(हेही वाचा :Ajit Pawar : चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले; थेट महापालिका आयुक्तांना केला फोन)
राज्य सरकार न्यायालयात ‘हे’ मुद्दे मांडणार
102 वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारकडे नव्हते, पण आता आता केंद्र सरकारने विधेयकात दुरुस्ती केली आहेत. राज्यात मराठा समाजाची संख्या कमी आहे. कुणबी मराठा वगळता मराठा समाज 16 टक्के आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती पाहिली जावी. हे मुद्दे राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मांडले जाणार आहेत.