मुंबईतील कोणते विभाग झाले कोविड मुक्त? वाचा…

137

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तिसऱ्या लाटेची भिती वर्तवली जात होती. परंतु, मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याचे समाधान मुंबईकरांमध्ये असतानाच आता कोविड मृतांचा आकडा शून्यावर येत असल्याने त्यात आणखी भर पडली आहे. १३ फेब्रुवारीला मुंबईतील धारावी, दादरमध्ये एकही नवा कोविड रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे तमाम मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईसह महाराष्ट्र कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांच्या ऑफिसमधल्या ‘दांड्या’ वाढल्या! ‘हे’ आहे कारण )

१३ फेब्रुवारी रविवारी, मुंबईत दादर, धारावी भागात एकही कोरोना रुग्ण आढळला नसून आजवर एकूण बाधित रुग्णसंख्या अनुक्रमे १३ हजार ५२० व ८ हजार ६३३ एवढी आहे. तर, माहिम भागात १३ फेब्रुवारीला २ रुग्ण आढळले असून, आजवर एकूण बाधित रुग्णसंख्या १४ हजार ५३४ एवढी आहे.

येत्या आठवड्याभरात मुंबईत 100 टक्के लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईत 100 टक्के अनलॉक केला जाऊ शकतो, अशी शक्यता महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे.

धारावी, दादर, माहिम विभागातील रुग्णसंख्या 

  • एकूण बाधित रुग्ण : ३६ हजार ६८७
  • बरे झालेले रुग्ण : ३५ हजार ६३९
  • एकूण सक्रिय रुग्णांची संख्या : ६७
  • एकूण दाखल रुग्ण : १२
  • बाधितांपैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या : ५७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.