गुढीपाडवा या सणापासून हिंदू नववर्षाची सुरूवात होते. हिंदू पंचागानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभा यात्रा देखील काढल्या जातात. इतंकच नाहीतर गुढीपाडवा हा सण विशेष अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने, नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे अनेक ग्राहक सोन्या- चांदीचे दागिने खरेदी करण्यास पसंती देतात. (Todays Gold-Silver Price)
गेल्या काही दिवसांपासून सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय. यातच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९० हजारांवर पोहोचला आहे तर १ किलो चांदीचा दर १ लाखांच्या पार गेला आहे. (Todays Gold-Silver Price)
हेही वाचा- PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी नागपुरात दाखल ; शहरात ‘एक है तो सेफ हैं’ च्या बॅनर्सची चर्चा
गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच -चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बुलियन मार्केटनुसार, देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८९,३२० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८१, ८७७ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,००८ रुपये आहे. तर आज १ किलो चांदीचा दर १००,७६० रुपये झाला आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत ही वाढ मोठी आहे. (Todays Gold-Silver Price)
हेही वाचा- Mulund Dumping Ground च्या प्रकल्पांतर्गत जून २०२५ पर्यंत किती उपलब्ध होणार जमीन?
काही दिवसांपूर्वी सोन्याच- चांदीच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे ग्राहकांना काहीप्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता, मात्र ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झाल्याचे दिसत आहे. (Todays Gold-Silver Price)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community