सप्टेंबर महिन्यापासून मुंबईत गोवरची पाच विभागात साथ पसरली आहे. सप्टेंबरपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत ८४ लहान बालकांना गोवरची बाधा झाली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालिकेने या सर्व विभागांत १३० मुलांचे लसीकरण केले आहे. शिवाय ५ गर्भवतींनाही लसीकरण दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
( हेही वाचा : संजय राऊतांचे परतणे अनेकांच्या लांगले जिव्हारी)
सर्वाधिक रुग्ण हे एमपूर्व विभागात पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांना आढळून आले. खबदारीचा उपाय म्हणून पालिकेने एफ-उत्तर, एच-पूर्व,एल, एम-पूर्व तसेच पी-उत्तर या विभागात पाच वर्षांपर्यंत मुलांमध्ये गोवर या आजाराचा संसर्ग आढळून आला आहे. एमपूर्व विभागात ६ लाख ९ हजार २१८ घरांचे पालिका अधिका-यांनी सर्व्हेक्षण केले. ९ महिने ते १६ महिन्यांच्या संशयित रुग्णांना ‘अ’ जीवनसत्त्व दिले जात आहे. तसेच लसीकरणाची वेगवेगळी सत्रे आयोजित करण्यात आली आहे.
गोवर या आजाराबाबत –
- गोवर या आजारात लहान मुलांमध्ये सर्दी, खोसला व अंगावर लालसर पुरळ येतात.
- अर्धवट व लसीकरण न झालेल्या बालकांमध्ये या आजारामुळे होणारी गुंतागुंत गंभीर स्वरुपाची होऊ शकते. यात फुफ्फुसाचा दाह, अतिसार, मेंदूचा संसर्गही होण्याची भीती आहे.
गोवरच्या लसीकरणाबाबत –
गोवर तसेच रुबेला या आजाराची पहिली मात्रा बालकाला ९ महिने पूर्ण झाल्यावर व दुसरी मात्रा १६ महिने पूर्ण झाल्यानतंर दिली जाते. या दोन्ही मात्रा पालिकेच्या आरोग्य केंद्र, दवाखाने, रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांत मोफत उपलब्ध आहेत.
Join Our WhatsApp Community