देशभरातील स्वच्छतागृहांची माहिती एका क्लिकवर; हे अनोखे अ‍ॅप आहे तरी कसे?

191

अलिकडे इंटरनेटवर आपल्याला सर्व गोष्टींबाबत माहिती मिळते. एखादे रेस्टॉरंट, पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल किंवा इतर कोणतीही माहिती आपल्याला गुगलवर एका क्लिकवर मिळते. परंतु अनेकदा स्वच्छतागृह, शौचालयांची माहिती आपल्याला अचूक मिळत नाही. परंतु आता प्रवासादरम्यान अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आता नागरिकांना अ‍ॅपमार्फत परिसरातील सुलभ शौचालय किंवा स्वच्छतागृहांची माहिती मिळणार आहे. तुम्हाला हे अ‍ॅप परिसरात किती स्वच्छतागृह आहेत आणि त्यात किती प्रमाणात स्वच्छता आहे याची अचूक माहिती देईल.

( हेही वाचा : बेस्ट डबलडेकर बस सेवेची ८५ वर्ष! आता असा होणार कायापालट…)

टॉयलेट सेवा अ‍ॅप

टॉयलेट सेवा असे या अ‍ॅपचे नाव आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्हाला परिसरातील स्वच्छतागृहांची माहिती मिळणार आहे. हे अ‍ॅप विशेषत: महिलांसाठी उपयुक्त आहे. टॉयलेट सेवा या नावाचे हे अ‍ॅप अमोल भिंगे यांनी बनवले आहे. अमोल भिंगे हे पुण्याचे असून ते अमेरिकेतील खाजगी संस्थेत कार्यरत आहेत. त्यांना पुण्यात याविषयी अनुभव आला त्यानंतर भिंगे यांनी अशाप्रकारचे अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला.

अनेकदा बाहेरगावी गेल्यावर प्रामुख्याने महिला पर्यटकांना अडचणी उद्भवतात. परिसरातील लोकांना सुद्धा योग्य माहिती नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. टॉयलेट सेवा हे अ‍ॅपमध्ये तुम्हाला शहरातील विविध भागात असणाऱ्या स्वच्छतागृहांची माहिती मिळेल. हे अ‍ॅप वापरण्यास सुद्धा एकदम सोपे आहे. पुण्यातील २६०० स्वच्छागृहांची माहिती तुम्हाला या अ‍ॅपमध्ये मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना या शौचालायांमध्ये किती स्वच्छता आहे याचीही माहिती देण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.