रस्ते वाहतुकीचा टोल वसूल करण्यासाठी सध्या वापरात असलेली ‘फास्टॅग’ची (Fastag) व्यवस्था लवकरच रद्दबातल होणार आहे. त्याऐवजी उपग्रहावर आधारित इलेक्ट्रॉनिक टोलवसुली (Electronic toll collection) व्यवस्था आणण्यात येणार आहे. ही टोलवसुली व्यवस्था २ वर्षांत टप्प्याटप्प्याने नवी व्यवस्था लागू केली जाणार आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जीएनएसएस आधारित टोल संकलन यंत्रणा लागू करण्यासाठी जागतिक कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत.
(हेही वाचा – Champions Trophy : चॅम्पियन्स चषकासाठी पाकिस्तानची भारताला लाहोरमध्ये खेळण्याची ऑफर)
२ वर्षांत सर्व टोल वसुली जीएनएसएस होणार
‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’ (Global Navigation Satellite System, जीएनएसएस) ही व्यवस्था रस्ते टोल वसुलीसाठी आणली जाणार आहे. सर्वप्रथम व्यावसायिक वाहनांसाठी जीएनएसएस लागू केले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कार, जीप आणि व्हॅन या वाहनांसाठी ती लागू केली जाईल. सुमारे २ वर्षांच्या कालावधीत देशातील सर्व टोल वसुली यावर आणली जाईल. ही व्यवस्था लागू झाल्यानंतर सध्याचे टोल नाके आणि फास्टॅग या दोन्हींची गरज राहणार नाही, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले आहे.
वाहतुकीच्या कोंडीपासून सुटका
नव्या तंत्रज्ञानामुळे टोल नाक्यांवर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीपासून सर्वांची सुटका होईल. वाहन महामार्गावर जेवढे अंतर चालेल, तेवढा टोल वसूल केला जाईल. या तंत्रज्ञानात वाहनावर उपग्रहाची नजर असणार आहे. प्रत्येक टोल प्लाझावर २ अथवा त्यापेक्षा अधिक जीएनएसएस मार्गिका असतील. या रचनेत वाहनांची ओळख पटविण्यासाठी तेथे अग्रिम रीडर बसविले जाणार आहेत. ज्या वाहनांकडे जीएनएसएस नसेल त्यांच्याकडून जास्तीची वसुली केली जाईल, असे सांगण्यात येते.
Join Our WhatsApp Community