लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकार सतर्क झाले असून, रोगावर नियंत्रणासाठी मिळवण्यासाठी आणि विविध उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशभरात लम्पीच्या लसीकरणाचा वेगही वाढवण्यात येत आहे. यासोबतच लम्पी या आजारासाठी अपत्ती व्यवस्थापन विभागाकडून टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
(हेही वाचा – परवानगी मिळो न मिळो, दसरा मेळावा ‘शिवतीर्था’वरच… शिवसेनेचं शिष्टमंडळ BMC कार्यालयात)
या टोल फ्री क्रमांकावरून नागरिकांनी माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन देखील कऱण्यात येत आहे. यामुळे या आजाराने बाधित झालेल्या जनावरांवर वेळीच औषधोपचार करून जनावराला झालेल्या आजारावर नियंत्रण मिळवणं शक्य झाले आहे.
आजाराबाबत पशुपालकांच्या तक्रारी निवारण करण्याकरता पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९६२ व जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०७२६२-२४२६८३ व टोल फ्री क्रमांक १०७७ सुरु करण्यात आला आहे. या आजारासाठी वेळीच उपचार केल्यास जनावरे पूर्णपणे बरी होतात, त्यामुळे पशू पालकांनी तक्रारीसाठी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले जात आहे.