Samruddhi Mahamarg : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील (Mumbai – Nagpur Samruddhi Highway) प्रवास महागणार आहे. समृद्धी महामार्गावरील टोल दरात 1 एप्रिलपासून वाढ (toll rates increased) होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) ‘समृद्धी’वरील पथकरात १९ टक्क्यांची वाढ केली आहे. हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना १,४४५ रुपये, तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी १२९० रुपये टोल लागेल. (Samruddhi Mahamarg)
(हेही वाचा – Pimpri-Chinchwad पोलीस आयुक्तालयासाठी १५ एकर जागेच्या भूसंपादनास शासनाची मान्यता)
1 एप्रिलपासून कार आणि एलएमव्ही (लाईट मोटर व्हेइकल) साठी प्रति किलोमीटर 2.06 रुपये टोल आकारला जाईल. मिनी ट्रक आणि मिनी बससाठी 3.32 रुपये प्रति किलोमीटर टोल आकारला जाणार आहे. तर दोन एक्सेल असलेल्या म्हणजेच चार किंवा सहा चाकांच्या बस आणि ट्रकसाठी 6.97 रुपये प्रति किलोमीटर टोल निश्चित करण्यात आला आहे. कन्स्ट्रक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी किंवा ट्रेलरसाठी 10.93 रुपये प्रति किलोमीटर टोल आकारला जाईल. तर सात किंवा त्याहून अधिक एक्सेल असलेल्या वाहनांसाठी 13.30 रुपये प्रति किलोमीटर टोल आकारण्यात येणार आहे.
नागपूर-इगतपुरी प्रवासासाठी टोल किती?
वाहनांचा प्रकार सध्याचे दर नवे दर
कार, हलकी मोटार १०८० १२९०
हलकी, व्यावसायिक, मिनी बस १७४५ २०७५
बस अथवा दोन आसांचा ट्रक ३६५५ ४३५५
तीन आसांची व्यावसायिक ३९९० ४७५०
अवजड बांधकाम यंत्रसामुग्री ५७४० ६८३०
अति अवजड वाहने ६९८० ८३१५
(हेही वाचा – BMC School : महापालिका शाळांमध्ये वीज बचतीचा धडा; वाचवणार तब्बल ४० ते ५० टक्के वीज)
यापूर्वी महामार्ग (Highway) सुरू झाला तेव्हा म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार व हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये पथकर आकारला होता. तसेच १ एप्रिलपासून नवे टोलदर लागू होणार आहेत. पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२८ पर्यंत ते लागू राहतील, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community