रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन नियम, राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम २०२४ या नावाने ओळखला जाईल. या नियमांतर्गत राष्ट्रीय महमार्गांवर सुरुवातीचे २० किलोमीटर शून्य शुल्क धोरण लागू करण्यात आलेलं आहे..यापूर्वी जुलै महिन्यात रस्ते मंत्रालयाने FASTag सोबतच प्रायोगित तत्त्वावर ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टम (GNSS) नुसार टोल (Toll) संकलन प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती. नवीन नियमांनुसार २० किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करायचा असल्यास GNSS चा अवलंब करावा लागणार आहे.
(हेही वाचा बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील आश्रमशाळांमध्ये CCTV बसवण्याचा सरकारचा आदेश; त्यासाठी बनवली कार्यपद्धत)
राष्ट्रीय महामार्ग, स्थायी पूल, बायपास रस्ता, बोगद्यातील रस्ता.. या मार्गावरील सुरुवातीचे २० किलोमीटर मोफत प्रवास करता येणार आहे. राष्ट्रीय परमिट असलेल्या वाहनांना या नियमांनुसार लाभ घेता येणार नाही. वाहनाने २० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला तर वाहनधारकांकडून पुढच्या वीस किलोमीटरप्रमाणे फी वसूल केली जाईल. या बदलांचा उद्देश हा जवळच्या प्रवासासाठी चालकांचा बोझा कमी करण्यासाठी आहे. लांबच्या प्रवासासाठी योग्य ते शुल्क आकारले जाणार आहे. मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या आदेशामध्ये म्हटले की, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम आधारित शुल्क प्रणालीनुसार जे चालक, मालक किंवा वाहनाचा प्रभारी व्यक्ती राष्ट्रीय परमिटशिवाय त्याच भागात प्रवास करत असेल तर त्याला संबंधित दिशेला २० किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत असेल. जर प्रवास २० किलोमीटरपेक्षा जास्त झाला तर केवळ योग्य त्या प्रवासाच्या अंतराप्रमाणे पैसे कपात होतील. (Toll)
Join Our WhatsApp Community