टोल टॅक्सच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार अनेकांची टोल टॅक्स भरण्यापासून सूटका होणार आहे. याबाबतची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ज्या प्रकारे देशभरात रस्त्यांची स्थिती बदलून त्यांचे नवनिर्माण होत आहे, त्याच प्रकारे टोलचे भाडेही वाढत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने नवे टोल नियम जारी केले असून, त्यात अनेकांना टोल भरण्यापासून दिलासा मिळाला आहे.
या लोकांना कर भरावा लागणार नाही
केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारेही आपापल्या परीने टोल टॅक्स भरण्याचे नियम जारी करतात. त्यामुळे आता मध्य प्रदेशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा पैसा वाचणार आहे. मध्य प्रदेशात खासगी वाहनांना कोणत्याही प्रकारचा टोल भरावा लागणार नाही. फक्त व्यावसायिक, खासगी वाहनांनाच टोल भरावा लागणार आहे. मध्यप्रदेशात याआधी सर्व चारचाकी वाहनांकडून टोल टॅक्स वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्यानंतर सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, केवळ व्यावसायिक, खासगी वाहनांवरच टोल टॅक्स लागू केला जाणार असून तो फक्त त्यांच्याकडूनच गोळा केला जाणार आहे, असे MPRDC चे डीएम एमएच रिझवी यांनी सांगितले. त्यामुळे मध्यप्रदेशातील जनतेला लाभ मिळणार आहे.
(हेही वाचा – ‘त्या’ दिवशी फडणवीसांच्या ड्रायव्हिंगला मुख्यमंत्री घाबरले! मोदींकडूनही झाली चौकशी; म्हणाले…)
याशिवाय या मार्गावरील कार, जीप, प्रवासी बससह खासगी वाहनांना टोल टॅक्समध्ये सवलत देण्याचा निर्णय गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, असेही सांगितले जात आहे. याशिवाय टोल टॅक्स न भरणाऱ्यांची यादी केंद्र सरकारकडून तयार करण्यात आली आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते रूग्णवाहिका अशा वाहनांचा समावेश आहे, ज्यांना कोणत्याही प्रकारचा टोल टॅक्स भरावा लागत नाही.
या लोकांना टोल टॅक्समध्ये मिळणार सूट
राज्य सरकारने म्हटले की, माजी आणि विद्यमान संसद आणि विधानसभेचे सदस्य, भारतीय लष्कर, अग्निशमन दल, भारतीय पोस्ट, शेतीसाठी वापरण्यात येणारी ट्रॅक्टर ट्रॉली, ऑटो रिक्षा, दुचाकी याशिवाय मान्यताप्राप्त पत्रकार, प्रवासी वाहनांनाही टोल टॅक्समध्ये सूट मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community