समृद्धी महामार्गावर किती भरावा लागणार टोल? वाचा दर

बहुप्रतिक्षित असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा 2 मे पासून सुरू होत आहे. या पहिल्या टप्प्यातीळ 210 किमीचा पल्ला अतिशय वेगाने म्हणजेच अवघ्या दीड तासांत पार करता येणार आहे. मात्र यासाठी वाहनचालकांना 365 रुपये टोल भरावा लागणार आहे.

(हेही वाचाः आता पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचणं होणार बंद, पश्चिम आणि मध्य रेल्वेचा ‘हा’ आहे प्लॅन)

2 मे रोजी लोकार्पण

राज्याच्या मुंबई आणि नागपूर या दोन्ही राजधान्यांना जोडणारा समृध्दी महामार्ग 701 किमीचा आहे. एमएसआरडीसी(महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ)कडून या रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पण या महामार्गावरील मुंबई ते शेलू बाजार या 210 किमीच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 2 मे रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः युद्धातही देशाच्या मदतीला धावून आली होती ‘एसटी’)

एकूण 8 टोलनाके

या पहिल्या टप्प्यात एकूण 8 टोलनाके बसवण्यात आले आहेत. या टोलनाक्यांवर कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या हलक्या मोटार वाहनांना प्रतिकिमी 1.73 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. त्यामुळे या वाहनचालकांना 365 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.

(हेही वाचाः पाऊस पडला म्हणून सचिन ‘ती’ मॅच खेळू शकला आणि त्याने पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला ‘धू-धू धुतला’)

(हेही वाचाः ‘या’ चुका झाल्या नसत्या तर सचिनच्या नावावर 102 सेंच्युरी असत्या)

एकूण 26 टोलनाके

समृद्धी महामार्गाचे काम 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडल्याचे सांगण्यात येत आहे. जून 2023 पर्यंत हा संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असा अंदाज आहे. या 701 किमीच्या महामार्गावर एकूण 26 टोलनाके बसवण्यात येणार आहेत.

(हेही वाचाः भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here