संस्कृतीदर्शक दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडला संपवणार

शहरात लोक शिकलेले आहेत. टीव्हीच्या आधीच्या काळात काहीही दाखवले तरी चालायचे, त्यात नावीन्य वाटायचे. पडदा म्हणजे नावीन्य, कुतूहल होते. आता पडदा हा प्रकारच राहिला नाही. लोकांच्या घरीच प्रोजेक्टर असतात, होम थिएटर असतात, त्यामुळे ते महागडे तिकीट घेवून थिएटरमध्ये जात नाहीत. सध्या प्रेक्षक वास्तववादी बनले आहेत. लॉकडाऊनने आपल्याला हे शिकवले आहे. आता ओटीटीवर शिवीगाळही चालते, त्यावेळी काही लोकांनी आक्षेप घेतला पण आता बघतात. चित्रपटांना बॉयकॉट करणारे किती जण सिरियस असतात, किती जण उगाच विरोधाला विरोध म्हणून करतात, किती जण बिनकामाचे विरोध करतात आणि किती जण राजकारण म्हणून विरोध करतात हेही पाहायला पाहिजे. वास्तविक जेव्हा सेन्सॉर बोर्ड चित्रपटाला प्रमाणपत्र देते तेव्हाच विषय संपतो.

दाक्षिणात्य सिनेमे संस्कृती दाखवतात

लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांनी साऊथचे डब केलेले सिनेमे आणि ओटीटी पाहिले आहेत. त्यानंतर जेवढे बॉलिवूडचे सिनेमे आले, ते तुलनेने वास्तववादी वाटले नाहीत. त्यामुळे ते चालले नाहीत. करोडो रुपये लावूनही चित्रपट चालत नसेल, म्हणून काहीतरी करावे लागेल, भले लोक पडद्यापर्यंत पोहचले नाही तरी निदान ओटीटीमध्ये तरी लोक पाहतील. त्यासाठी चित्रपटाची चर्चा झाली पाहिजे, म्हणून त्यात काहीतरी वादग्रस्त दाखवले जात आहे. सिनेमात चांगले कथानक नसते, उलट दाक्षिणात्य सिनेमात संस्कृती दाखवतात, जी लोकांना पडद्यावर बघायची असते. आपण ना महाराष्ट्रात दाखवत ना बॉलिवूडमध्ये दाखवत, त्यामुळे याचा जास्त फटका बॉलिवूडला बसणार आहे. त्यामुळे मग भगव्या रंगाची बिकिनी दाखवण्याचा फालतूपणा केला जातो.

(हेही वाचा महाराष्ट्र केसरी पहिला टप्पा ऑलिम्पिक ध्येय ठेवा; शरद पवारांचे महाराष्ट्र केसरी विजेत्याला आवाहन)

गल्ला जमवावा म्हणून काहीही करण्याचा प्रयत्न

चित्रपटाने चांगला गल्ला जमवावा म्हणून काहीही करण्याचा जो प्रकार बॉलिवूडने सुरु केला आहे. तोच बॉलिवूडला मारक ठरणार आहे. चित्रपट चालावा म्हणून त्यात वाद कसा निर्माण होईल, त्याला विरोध होऊन चित्रपट चर्चेत कसा येईल, हा उद्देश बॉलिवूडचा असतो. मात्र त्याचा उलट परिणाम होताना दिसत आहे. प्रेक्षक जाणकार झाला आहे. त्याला चांगले-वाईट कळते. तसेच अशा क्लृप्त्याही त्याला समजू लागल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षक वर्ग अशा गोष्टींना बळी पडत नाही. प्रेक्षक वर्ग हा वास्तववादी चित्रपट पाहण्यातच रुची ठेवतो आणि त्यांची भूक दाक्षिणात्य चित्रपट भागवतात. म्हणून दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षक वर्ग उचलून धरत आहेत. दाक्षिणात्य चित्रपट त्यामुळे बॉलिवूडला संपवणार आहे. या गोष्टी बॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्यांना लक्षात येत नाहीत. म्हणूनच दाक्षिणात्य चित्रपट आणि वेब सिरीज यांना ओटीटी प्लॅटफॉर्म उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. त्या व्यासपीठावरही बॉलिवूड अपयशी ठरत आहे.

म्हणून परदेशी कंपन्या पैसा कमवतात

या अशा प्रकारांमुळे लोक वेब सिरीजकडे वळत आहेत आणि डिस्नी होस्टर, अॅमेझॉन, नेटप्लिक्सवर लोकांची गर्दी होते आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या परदेशी कंपन्या पैसा कमावता. त्यांना जगभरातून प्रेक्षक वर्ग मिळतो त्यामुळे ते बक्कळ पैसा कमावतात, हे आपल्या लोकांना समजत नाही, हे खेदजनक आहे.

लेखक – शिवाजी लोटन पाटील, चित्रपट दिग्दर्शक.

(हेही वाचा ‘वन-डे’मध्ये विराटच बेस्ट; विश्वविक्रमापासून तीन शतके दूर)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here