भारताने टोमॅटोचे (Tomato) देशातले दर कमी करण्याच्या दृष्टीने नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याची तयारी चालवली आहे. छोट्या प्रमाणात ही आयात सुरूही झाली असून पहिला माल वाराणसी, लखनौ आणि कानपूर इथं पोहोचलाही आहे.
(हेही वाचा – Kareena Shaikh : पूर्व उपनगरातील गुन्हेगारांची ‘गॉडमदर’ करीना शेखवर गुन्हा दाखल)
त्यामुळे राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची (Tomato) आवक वाढल्यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर कमी होऊ लागले आहेत. १२५ ते २०० रुपयांवर गेलेले घाऊक बाजारातील दर आता ७० ते ८५ रुपयांवर आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना (Tomato) मोठा दिलासा मिळाला आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो (Tomato) उपबाजारात रविवारी सुमारे दहा हजार क्रेटची (२० किलोचा एक क्रेट) आवक झाली. टोमॅटोला (Tomato) सरासरी ४० ते ७६ रुपये प्रति किलो दर मिळाला. हा शेतकऱ्यांना मिळणारा होलसेल विक्रीचा दर आहे. राज्यात विक्री होताना या दरात सरासरी २० रुपये वाढ होऊन ६० ते १०० रुपये किलो दराने किरकोळ विक्री होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community