ऋजुता लुकतुके
भारताने टोमॅटोचे (Tomato) देशातले दर कमी करण्याच्या दृष्टीने नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याची तयारी चालवली आहे. छोट्या प्रमाणात ही आयात सुरूही झाली असून पहिला माल वाराणसी, लखनौ आणि कानपूर इथं पोहोचलाही आहे. पण, इथून पुढे जास्त प्रमाणात टोमॅटोची निर्यात करण्यासाठी नेपाळची तयारी आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच राज्यसभेत नेपाळमधून टोमॅटो (Tomato) आयात करण्याचं सरकारी धोरण स्पष्ट केलं होतं. देशात मागच्या तीन महिन्यांत टोमॅटोच्या दरात १४०० टक्क्यांची वाढ झाली होती. आधी ५० ते ६० रुपये किलोने मिळणारे टोमॅटो किलोमागे २४० रुपयांवर गेले होते.
त्यानंतर केंद्रसरकारने टोमॅटो (Tomato) आयातीचा निर्णय घेतला. ही निर्यात दीर्घ मुदतीसाठी करायची असेल तर मात्र नेपाळने काही अटी मांडल्या आहेत. त्यांना भारतीय बाजारपेठांची उपलब्धता हवी आहे. टोमॅटो आणि इतर कृषि माल भारतीय बाजारपेठांपर्यंत सुटसुटीतपणे पोहोचण्याची हमी त्यांना हवी आहे.
(हेही वाचा – Free Medical Treatment : १५ ऑगस्टपासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत मिळणार मोफत उपचार)
नेपाळकडून निर्यातीची हमी मिळाल्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने लेखी पत्रक काढून नेपाळमधून टोमॅटोची (Tomato) आयात सुरू झाल्याचं पत्रकही काढलं आहे. अलीकडे काही भागात झालेला तुफान पाऊस आणि टोमॅटोच्या पिकाला लागलेली किड ही देशांतर्गत उत्पादन कमी झाल्याची मुख्य कारणं मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात देण्यात आली आहेत.
नेपाळच्या कृषिखात्याचे प्रवक्ते शबनम शिवाकोटी यांनी आपली भूमिका मांडताना काही गोष्टी स्पष्ट केल्या. ‘नेपाळलाही भारतात टोमॅटो (Tomato) तसंच इतर भाज्या निर्यात करायच्या आहेत. पण, आम्हाला व्यवहारांची मुदत दीर्घकालीन असेल तर जास्त बरं वाटेल. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय बाजारपेठांची उपलब्धता आणि इतर पायाभूत सुविधांची हमी आम्हाला हवी आहे,’ असं शिवाकोटी पीटीआयशी बोलताना म्हणाले.
नेपाळने टोमॅटोची (Tomato) निर्यात भारतात सुरूही केली आहे. पण, सध्या हे प्रमाण कमी आहे. नेपाळच्या काठमांडू पट्टयात टोमॅटो मोठ्या प्रमाणावर पिकतो. ललितपूर, भक्तपूर या जिल्ह्यात टोमॅटो मोठ्या प्रमाणावर पिकतो. स्थानिक गरजेपेक्षा इथं टोमॅटो जास्त प्रमाणात पिकतो. आणि तो निर्यातही केला जातो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community