देशासह राज्यात टोमॅटोने शंभरी पार केली आहे. अशातच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोची आवक घटली आहे. यामुळे दरात वाढ झाली असून, किलोला १०० ते १२० रुपयांचा भाव मिळत आहे. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होतोय तर, ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.
पुरवठा कमी झाल्याने दरात वाढ
सध्या राज्याच्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या भागात पावसाने अजून हजेरी न लावल्याने टोमॅटोचे नवीन उत्पादन होत नाही. याच कारणामुळे बाजारपेठांमध्ये टोमॅटोचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. काही ठिकाणी राज्यात टोमॅटोचे दर हे १४० रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर, पेट्रोलचा दर प्रती लिटर १०७ रुपये असून टोमॅटोने पेट्रोलच्या दरालाही मागे टाकत विक्रम रचला आहे.
(हेही वाचा – अर्थ, सार्वजनिक बांधकामसह महत्त्वाच्या खात्यांसाठी राष्ट्रवादी आग्रही; शिवसेनेतून नाराजीचे सूर)
दिल्लीत टोमॅटोचे दर हे १४० रुपये प्रतिकिलोवर
दिल्लीत टोमॅटोचे दर हे १४० रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. मदर डेअरीच्या सफाल विक्री केंद्रात १०० रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत होती. तर बिगबास्केटवर टोमॅटोचे दर हे १०५ ते ११० रुपये किलोवर आहेत. टोमॅटोचे दर केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नाही तर देशाच्या इतर भागातही गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या दरवाढ ही हवामानाती झालेल्या बदलामुळे झाल्याचे सरकारने म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community