राज्यातल्या सततच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतीवर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या काही शहरांमध्ये टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर दुप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे ३० रुपयाला मिळणारे टोमॅटो आता ५० ते ६० रुपये किलो इतके झाले आहेत. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे.
किंमत वाढण्याचे काय आहे कारण?
टोमॅटोच्या वाढत्या दरामागे ‘कमी साठा’ हे सर्वांत महत्वाचे कारण असल्याचे एपीएमसी वाशीचे संचालक संजय पिंगळे यांनी सांगितले. संजय पिंगळे यांनी सांगितल्यानुसार काही महिन्यांपूर्वी जादा उत्पादन झाल्याने टोमॅटो कवडीमोल भावाने विकले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली नाही. परंतु मला आशा आहे की ही परिस्थिती नक्की सुधारेल.
(हेही वाचा – Eknath Shinde : कितीही फाटे फुटले तरी आमची मैत्री तुटायची नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
तसेच वाशीचे घाऊक विक्रेते मंगल गुप्ता यांनी सांगितल्यानुसार ‘टोमॅटोची घाऊक किंमत १६-२२ रुपये प्रति किलो आहे. मात्र या दरात अचानक वाढ झाली त्याचे मूळ कारण म्हणजे मागच्या महिन्यात उत्पादन अधिक असल्याने योग्य तो भाव मिळाला नाही. अशातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे खराब हवामानामुळे ५० टक्के पिके नष्ट झाली. त्यामुळे या महिन्यात उत्पादन कमी असल्याने किमतीमध्ये वाढ झाली आहे. जर हवामान अनुकूल राहिले तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दर पूर्ववत होतील.
पुण्यातील व्यापारी काय म्हणाले?
पुण्यातल्या व्यापारांनी सांगितले की काही महिने आधी उत्पादनाच्या कमीमुळे घाऊक किंमत १० ते २० रुपये प्रति किलोपर्यंत घसरली होती. मात्र, दोन महिन्यांत त्या पाचपटीने वाढल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत, अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेणे एकतर सोडून दिले किंवा नष्ट केले कारण त्यांना किरकोळ बाजारात योग्य भाव मिळत नव्हता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community