Tomato Prices : टोमॅटोने गाठली शंभरी, दर आणखी वाढण्याची शक्यता

मुसळधार पावसाचा परिणाम टोमॅटोच्या पिकावर झाला आहे.

142
Tomato Prices : टोमॅटोने गाठली शंभरी, दर आणखी वाढण्याची शक्यता
Tomato Prices : टोमॅटोने गाठली शंभरी, दर आणखी वाढण्याची शक्यता
  • ऋजुता लुकतुके

टोमॅटोचे दर (Tomato Prices) पुन्हा एकदा शंभरी गाठताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही चांगली गोष्ट असली तरी मध्यमवर्गीय घरांमध्ये काळजी पसरली आहे. एका बाजूला सरकारनं कमी दरात टोमॅटोची विक्री सुरु करुन देखील दिल्लीत टोमॅटोच्या दरात (Tomato Prices) वाढ होतेय. आणि हे दर शंभरीच्या पार गेले आहेत.

टोमॅटोचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काही शहरांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. असे असले तरीदेखील दरात वाढ होताना दिसत आहे. हवामानाचा मोठा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. देशातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे पिकाचं मोठं नकसान झालं आहे. त्यामुळं टोमॅटोच्या दरात (Tomato Prices) मोठी वाढ होत आहे. पुढच्या काळात आणखी टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय झालं? मनसेचे नेते Sandeep Deshpande यांचा खुलासा: म्हणाले… )

हिमाचल प्रदेशातील मुसळधार पावसाचा थेट परिणाम टोमॅटोच्या पिकावर होत आहे. आणि परिणामी, सुरुवातीला उत्तर भारतात हे दर वाढले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत टोमॅटोचे किरकोळ भाव पुन्हा एकदा १०० रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहेत. दिल्लीत टोमॅटोच्या दराने (Tomato Prices) यंदाच्या हंगामात एकदा शतक गाठले आहे. गेल्या महिन्यात दिल्लीच्या किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर १०० रुपये ते १२० रुपये किलोवर पोहोचले होते. दिल्लीतील मदर डेअरीच्या सफाल या दुकानात टोमॅटो १०० रुपये किलो दराने विकला जात होता. त्याचवेळी सफाल आउटलेट्स व्यतिरिक्त असंघटित किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर १०० ते १२० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते.

(हेही वाचा – मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करा; CM Eknath Shinde यांचे निर्देश)

सरकारच्या प्रयत्नांमुळे टोमॅटोचे भाव आटोक्यात येण्यास मदत झाली. सरकारने एनसीसीएफ सारख्या सहकारी संस्थांच्या मदतीने दिल्लीत अनेक ठिकाणी अनुदानित दरात टोमॅटो उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाव काही प्रमाणात खाली आले. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या दिल्लीत टोमॅटोचे किरकोळ दर ७० रुपये प्रति किलोच्या आसपास आहेत, तर आर्थिक राजधानी मुंबईत किरकोळ किंमत ८० रुपये प्रति किलो आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया दिल्लीतील अनेक ठिकाणी टोमॅटो ६० रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विकत आहे. एनसीसीएफच्या पुढाकारामुळे किंमती आटोक्यात आणल्या जात आहेत. मात्र, पावसामुळे भाव पुन्हा १०० रुपयांच्या पुढे जाण्याचा धोका आहे. टोमॅटो लवकरच पुन्हा शतक ठोकेल अशी भीती व्यापाऱ्यांना आहे.

मागील वर्षा या महिन्यांत टोमॅटोच्या दरात (Tomato Prices) वाढ दिसून येत होती. गतवर्षी परिस्थिती खूपच बिकट झाली होती, किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव ३५० रुपये किलोवर पोहोचला होता. त्यानंतर सरकारने सहकारी संस्थांच्या मदतीने अनेक शहरांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.