राज्यात टोमॅटोचे दर अचानक गगनाला भिडले आहेत, ते इतके वाढले आहेत की पेट्रोलच्या दराच्या बरोबरीचे झाले आहेत. असेच दर जर वाढत राहतील तर दोन-तीन दिवसात टोमॅटो पेट्रोलापेक्षा महाग झालेले पाहायला मिळतील
अवकाळी पावसाचा फटका
मागील आठवडाभरापासून राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. विशेषतः भाज्या आणि फळ भाज्या या अल्पजीवी आणि नाशवंत असतात. त्यांचे लगेच नुकसान होते. त्यामुळे या अवकाळी पावसाने फळ भाज्या आणि भाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यातही टोमॅटोची रोपे झोपली आहेत. काही ठिकाणी टोमॅटो शेतातच कुजला आहे. परिणामी टोमॅटोची आवक बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या किंमतीवर झाला आहे. टोमॅटोचे दर आता ९०-१०० रुपय प्रती किलो पोहचले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांत ताटातून टोमॅटो गायब होण्याची वेळ आली आहे.
(हेही वाचा राणीबागेकडूनही शाकाहाराचा पुरस्कार)
आंध्रात टोमॅटोची शंभरी पार
दरम्यान मागील आठवड्यात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. अक्षरशः या राज्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या ठिकाणीही भाज्यांचे दर गगनाला पोहचले आहेत. या राज्यांमध्ये टोमॅटोचे दर ११०-१२० रुपये किलो इतके वाढले आहेत.
Join Our WhatsApp Community