छळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणता येणार नाही: Supreme Court चे महत्त्वाचे निर्देश

165
छळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणता येणार नाही: Supreme Court चे महत्त्वाचे निर्देश
छळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणता येणार नाही: Supreme Court चे महत्त्वाचे निर्देश

सध्या सगळ्या देशात सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष (Engineer Atul Subhash) यांच्या आत्महत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दीड तासाचा एक व्हिडिओ बनवला. त्यात आत्महत्येसाठी पत्नी आणि सासरकडच्या मंडळींना जबाबदार ठरवलं आहे. हे प्रकरण ताजे असतानाच सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) महत्त्वाची टिप्पणी समोर आली आहे.

हेही वाचा-Delhi Bomb Threat : दिल्लीतील ४ शाळांना पुन्हा बॉम्बच्या धमकीचे ईमेल; एका आठवड्यात दुसरी घटना

कुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे या गुन्ह्यात दोषी ठरवण्यासाठी केवळ छळ केल्याचं पुरेसे नाही. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे प्रवृत्त केल्याचे स्पष्ट पुरावे हवेत. हे गुन्हे सिद्ध करण्यासाठी त्यामागचा हेतू समजून घ्यायला हवा आणि त्यासाठी पुरावे बंधनकारक आहेत असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. न्या. विक्रम नाथ आणि न्या. पीबी वराले यांच्या पीठाने गुजरात हायकोर्टाच्या (Gujarat High Court) आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निर्णय देताना ही टिप्पणी केली. (Supreme Court)

हेही वाचा-Tamil Nadu hospital Fire : तामिळनाडूमध्ये रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ७ जणांचा मृत्यू, Video व्हायरल

या याचिकेत एका महिलेला कथितरित्या त्रास देणे आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे या आरोपाखाली तिचा पती आणि सासू सासऱ्यांना आरोपमुक्त करण्याची मागणी केली होती. अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण पाहता सुप्रीम कोर्टाने केलेली टिप्पणी महत्त्वाची मानली जाते. (Supreme Court)

प्रकरण काय ? (Supreme Court)
गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, 2021 मध्ये आयपीसीच्या कलम 498A (विवाहित महिलेवर क्रूरता) आणि 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत हा खटला दाखल करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, कलम 306 अंतर्गत दोषी ठरण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या हेतूचा सबळ पुरावा असणे आवश्यक आहे. आरोपीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दोषी सिद्ध करण्यासाठी केवळ छळ पुरेसा नाही. (Supreme Court)

आरोप करणाऱ्या पक्षाला पुरावे सादर करावे लागतील. ज्यामुळे आरोपीने थेट असे काहीतरी केले आहे. ज्यामुळे मृत व्यक्तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाईल. आरोपीच्या मनात अशी इच्छा होती की, पीडितेने आत्महत्या करावी असे आपण मानू शकत नाही. हे केवळ पुराव्यांवरूनच सिद्ध होऊ शकते. वैवाहिक मतभेदांमुळे उद्भवणाऱ्या घरगुती वादात पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना IPC कलम 498-A अंतर्गत गोवण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. (Supreme Court)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.