युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पाहून सरकारने दिला ‘हा’ सल्ला!

113

रशिया-युक्रेनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. भारत सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनहून आतापर्यंत सुमारे 13 हजार 300 भारतीय नागरिकांनी परत आणले आहे. तसेच पुढील 24 तासांसाठी 13 विमाने नियोजित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत त्यांना सरकारने महत्वाचा सल्ला दिला आहे.

( हेही वाचा : केंद्र सरकार घसरतंय… शरद पवारांचं मोठं विधान! )

परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन

भारताने गेल्या 24 तासांमध्ये 15 विमानांद्वारे 2 हजार 900 जण आले असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. मिशन गंगा अंतर्गत आतापर्यंत 63 विमाने भारतात पोहचली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. युक्रेनच्या युद्धग्रस्त सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर भारत सरकारने या विद्यार्थ्यांना घरांमध्ये सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी व्हिडिओमध्ये रशियाच्या सीमेकडे जात असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर सरकारने विद्यार्थ्यांना घरांमध्ये सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दूतावासाचे अधिकारी या विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. सरकारने विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आणि आश्रयस्थानांमध्ये राहण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यासाठी सरकारने रशियन आणि युक्रेनियन सरकारांवर तात्काळ युद्धबंदीसाठी अनेक माध्यमांद्वारे जोरदार दबाव आणल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.