मुंबईत गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही मृत्यूच्या आकड्याने सत्तरी गाठलेली आहे. गुरुवारी जिथे ७५ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे शुक्रवारीही ७२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर दिवसभरात ७,२२१ रुग्ण आढळून आले, तर ९ हजार ५४१ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.
४१ हजार ८२६ जणांच्या चाचणी करण्यात आल्या
मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ७ हजार २२१ रुग्ण आढळून आले. मागील चार दिवसांपासून साडेसात हजाराच्या आसपासच रुग्ण संख्या नियंत्रणात राखण्यात महापालिकेला यश आले आहे. मात्र, शुक्रवारपर्यंत संपूर्ण मुंबईत ८१ हजार ५३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. संपूर्ण दिवसभरात एकूण ४१ हजार ८२६ जणांच्या चाचणी करण्यात आल्या आहेत. तर मृत रुग्णांचा आकडा ७२ एवढा आहे. या मृत्यू पावलेल्या रुग्णांमधील ३७ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. या मृतांमध्ये ४७ पुरुष व २५ स्त्री रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील २ रुग्ण हे ४० वर्षांखाली आहेत. तर ४८ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत. आणि ४० ते ६० वयोगटातील २२ रुग्ण आहेत. मुंबईतील विविध कोविड रुग्णालये व कोविड केंद्रांमध्ये २१ हजार ५५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
(हेही वाचा : रुग्णाची घरी जावून वैद्यकीय तपासणी, मग मिळणार गरजेनुसार रुग्णखाट!)
दिवसभरात ८ झोपडपट्टी, चाळी कंटेन्मेंट झोनमध्ये
गुरुवारपर्यंत एकूण ११४ झोपडपट्टी व चाळी या कंटेन्मेंट झोनमध्ये होते, पण शुक्रवारी ही संख्या ११४ वरून १२२ एवढी झाली आहे. त्यामुळे दिवसभरात आठ कंटेन्मेंट झोन्मध्ये वाढल्या आहेत. तर ण्कूण १२११ इमारती व सोसायटी या सीलबंद करण्यात आल्या आहे.
Join Our WhatsApp Community