‘या’ शहरात राज्यातील ८० टक्के कोरोना रुग्णांची नोंद

188

राज्यात शनिवारी नव्याने आढळून आलेल्या १ हजार ३५७ रुग्णांपैकी एकट्या मुंबईत ८८९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात केवळ मुंबईत एका कोरोना रुग्णाने आपला जीव गमावल्याची नोंद झाली. वाढत्या रुग्णसंख्येत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पुन्हा खालावत आता ९८.०५ टक्क्यांवर आले आहे.

५ हजार ८८८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

सलग चार दिवस कोरोनाचे रुग्ण दरदिवसाला हजारोंच्या संख्येने दिसत आहेत. परिणामी, राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्याही आता पाच हजारांच्यावर गेली आहे. राज्यात आता ५ हजार ८८८ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या यादीतील ४ हजार २९४ रुग्ण एकट्या मुंबईत दिसून येत आहेत. ठाण्यातील रुग्णांची संख्या ७६९ वर पोहोचली आहे, तर पुण्यात ४४७ आणि रायगडात १३५ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार दिले जात आहे. पालघरमधील कोरोना रुग्णांची संख्या आता शंभरीजवळ आली आहे. पालघरमध्ये आता ८६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याखालोखाल नागपूरात ८६ आणि  नाशकात २३ सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे.

(हेही वाचा शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील मतभेद उघड)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.