भारतातील पर्यटकांना (Tourism) विदेशात प्रवास करण्याची ओढ असते, पण त्याकरिता पैशांची जुळवाजुळव इतर वस्तूंची आणि मुख्यत: व्हिसा काढणे, या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात खूप वेळ जातो. मात्र आता असे होणार नाही; कारण पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्हिसामुक्त प्रवेशाची परवानगी मिळवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
थायलंड, श्रीलंका आणि मलेशिया या देशांनी भारतातील पर्यटकांना व्हिसामुक्त प्रवेशाची परवानगी दिली आहे. या देशांच्या यादीत इंडोनेशियाचासुद्धा समावेश होण्याची शक्यता आहे; कारण तसा हालचाली इंडोनेशियानेसुद्धा सुरू केल्या आहेत.
(हेही वाचा- OBC Reservation : ओबीसी आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही – कपिल पाटील )
भारतातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी
इंडोनेशियाचे पर्यटन मंत्री सैंडियागा यूनो यांनी हिंदुस्थानसह अन्य काही देशांच्या पर्यटकांना व्हिसामुक्त प्रवासाची परवानगी देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत, अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. इंडोनेशिया पर्यटनाच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी इंडोनेशियाने अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान, दक्षिण कोरिया, जर्मनी, ब्रिटेन आणि फ्रांस या देशांसहित अन्य २० देशांमधील नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेशाची परवानगी देण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे. भारतातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इंडोनेशियाचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर इंडोनेशिया दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इंडोनेशियाच्या पर्यटन मंत्रालयाने या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
व्हिसामुक्त प्रवेश देण्याचा निर्णय का ?
देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी पर्यटनाची भूमिका महत्त्वाची ठरते. कोविड काळात लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधामुले पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत आणि इतर काही देशांनी नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मलेशिया, थायलंड, श्रीलंका या देशांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी व्हिसामुक्त प्रवेशाची परवानगी दिली आहे.
थायलंडमध्ये व्हिसामुक्त प्रवेशाची घोषणा
सप्टेंबरमध्ये इंडोनेशिया विदेशी नागरिक आणि कॉर्पोरेट गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी गोल्डन व्हिसाची घोषणा केली होती, तर थायलंडमध्ये व्हिसामुक्त प्रवेशाची घोषणा नोव्हेंबरमध्ये केली होती. भारतातील पर्यटकांना १० नोव्हेंबर २०२३ पासून १० मे २०२४ पर्यंत ३० दिवसांसाठी थायलंडमध्ये व्हिसामुक्त प्रवास करता येणार आहे.
हेही पहा –