३१ डिसेंबरला लोणावळ्याला जाताय? तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती…

136

लागोपाठ सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पर्यटनस्थळांना भेटी देतात. परंतु कोरोना प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मास्क, सॅनिटाईड आणि सोशल डिस्टनसिंग राखण्याचे आवाहन हॉटेल मालकांसह पर्यटकांना करण्यात आले आहे. हॉटेल, लॉजिंग आणि रिसॉर्ट मालकांना या उपाययोजना राबवण्याचे आवाहन लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केले आहे.

( हेही वाचा : आफताबचे ७० तुकडे करा; त्याची आमच्या मालमत्तेवर नजर होती…श्रद्धाच्या वडिलांचा खुलासा)

प्रशासनाकडून विशेष खबरदारी 

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पर्यटकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे तसेच केंद्र शासनाच्या सूचनांचे पालन हॉटेल धारकांनी करणे गरजेचे असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये मास्कसक्ती 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. तुळजापूर मंदिर, दगडूशेठ मंदिर, शिर्डीसह नाशिकच्या प्रमुख मंदिरांमध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.