समुद्र चौपाट्यांवर पर्यटकांना बंदी!

समुद्र किनारपट्टी व चौपाट्यांचा परिसर पर्यटकांसाठी  ३० एप्रिलपर्यंत बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता मुंबईतील सर्व समुद्र चौपाट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ज्या विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये अशाप्रकारच्या समुद्र चौपाटीचा परिसर येत आहेत, त्या विभागाच्या सहायक आयुक्तांनी याठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालून तिथे कोणी जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

पूर्वीचे निर्बंध!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी काही मार्गदर्शक सूचना केल्या असून त्याचे पालन करण्याचे निर्देश जारी केले आहे. यामध्ये  समुद्र चौपाटी परिसरात रात्री आठ वाजल्यानंतर कोणालाही तिथे प्रवेश देवू नये, असे त्यात नमुद केले होते. तसेच आठ वाजल्यानंतर जी व्यक्ती समुद्र किनारपट्टी परिसरात आढळून आल्यास त्यांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुद केल्या होत्या.

(हेही वाचा : ५ पेक्षा अधिक रुग्ण असलेली सोसायटी ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’!)

सुधारीत निर्बंध!

परंतु यामध्ये मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सुधारणा करून या चौपट्या येत्या ३० एप्रिल २०२१ पर्यंत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश विभागीय सहायक आयुक्तांना जारी केलल्या आहेत. शासनाच्या जारी केलेल्या निर्बंधाचे पालन करतानाच अतिरिक्त निर्बंध लागू करून कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करावे, असे निर्देश दिले आहेत. याअंतर्गतच समुद्र किनारपट्टी व चौपाट्यांचा परिसर पर्यटकांसाठी  ३० एप्रिलपर्यंत बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here