किर्लोस्कर उद्योग समूहाच्या चौथ्या पिढीतील विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

129

टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे मंगळवारी वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. बुधवारी दुपारी 1 वाजता बंगळुरू येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विक्रम किर्लोस्कर हे मोटार वाहन उद्योगातील प्रसिद्ध असे नाव होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने उद्योग जगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टोयोटा कार भारतात प्रसिद्ध करण्यामध्ये विक्रम किर्लोस्कर यांचे मोठे योगदान आहे. टोयोटा इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन किर्लोस्कर यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. विक्रम किर्लोस्कर हे देशातील नामवंत अशा किर्लोस्कर उद्योग समूहातील चौथ्या पिढीचे वारसदार होते.

(हेही वाचाः ‘आरे’ला ‘का रे’ नाहीच, मेट्रो कारशेडबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

विक्रम किर्लोस्कर यांचा परिचय

विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात त्यांची पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी असा परिवार आहे. एमआयटी इन्स्टिट्यूटमधून किर्लोस्कर यांनी मेकॅनिकल इंडिनिअरिंगची पदवी घेतली होती. तसेच त्यांनी त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. महत्वाच्या पदांवर देखील काम केले होते. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर उद्योग समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक देखील होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.