Mumbai Pune Express Way वर ३ दिवस ट्रॅफिक ब्लॉक

मुंबईहून पुण्याला द्रुतगती मार्गाने (Mumbai Pune Express Way) जाताना घाटातील वळणरस्ते टाळण्यासाठी दरीवरील दोन पूल व व दोन बोगद्यांद्वारे ‘मिसिंग लिंक’ची उभारणी सुरू आहे.

257

कायम रहदारीचा मार्ग असलेल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Way) पुढील तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांना दुसऱ्या मार्गावरून जावे लागणार आहे.

मुंबईहून पुण्याला द्रुतगती मार्गाने (Mumbai Pune Express Way) जाताना घाटातील वळणरस्ते टाळण्यासाठी दरीवरील दोन पूल व व दोन बोगद्यांद्वारे ‘मिसिंग लिंक’ची उभारणी सुरू आहे. पुण्याकडे जाताना लोणावळ्यातील घाट उतरताच डोंगरगाव/कूसगाव येथे स्थानिक वाहनांची ये-जा करण्यासाठी असलेला भूमिगत रस्ता याच ‘मिसिंग लिंक’च्या बांधकामासाठी पाडण्यात आला होता. आता ‘मिसिंग लिंक’चे मुख्य बांधकाम पूर्ण झाल्याने स्थानिकांना ये-जा करता येण्यासाठी अंडरपारऐवजी द्रुतगती मार्ग ओलांडता येणारा पूल उभा होत आहे. त्या कामासाठी द्रुतगती मार्ग पुण्याच्या दिशेने २७ ते २९ जानेवारीदरम्यान दररोज दुपारी तीन तास कूसगावपासून बंद असेल. त्यामुळे वाहनचालकांवर अतिरिक्त पथकराचा भार येणार आहे.

(हेही वाचा Uniform Civil Code लागू करणारे पहिले राज्य ठरले उत्तराखंड; २७ जानेवारीपासून होणार अंमलबजावणी)

या काळात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना द्रुतगती मार्ग सोडून राष्ट्रीय महामार्ग ४८ (जुना मुंबई-पुणे महामार्ग) पकडून वरसोलीच्या दिशेने जावे लागेल. तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने द्रुतगती मार्गाने जाताना त्याआधी खालापूर येथे वाहनचालक २४० रुपये पथकर भरतात व पुढे पुण्याला जाण्यासाठी आणखी ८० रुपयांसह एकूण ३२० रुपये पथकराचा भरणा करतात. यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune Express Way) वाहनचालकांना एरव्हीच्या ३२० रुपयांऐवजी ३३० रुपये पथकर आता सोमवारपासून तीन दिवस दुपारी १२ ते ३ दरम्यान प्रवास केल्यास भरावा लागणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.