Pune : नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यात तीन ठिकाणी वाहतुकीत बदल, वाहतूक शाखेने केले ‘हे’ बदल

आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद

119
Pune : नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यात तीन ठिकाणी वाहतुकीत बदल, वाहतूक शाखेने केले 'हे' बदल
Pune : नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यात तीन ठिकाणी वाहतुकीत बदल, वाहतूक शाखेने केले 'हे' बदल

आजपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे पुणे शहरात (Pune)  वाहतूक शाखेने शहरातील चतु:श्रुंगी मंदिर, भवानी मात मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी या तीन ठिकाणी वाहतूकीत बदल ( Traffic changes) केले आहेत. यामुळे भाविकांना सुखरूपपणे दर्शन घेता येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगक यांनी दिली आहे.

आप्पा बळवंत चौक
आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असून, बुधवार चौक ते आप्पा बळवंत चौक, अशी एकेरी वाहतूक सुरू राहिल. पर्यायी मार्ग- आप्पा बळवंत चौक, गाडीतळ पुतळा येथून शिवाजी रोडने इच्छितस्थळी जाता येईल.

भवानी माता मंदिर
रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टॅण्ड यादरम्यानचा भवानी माता मंदिरासमोरील महात्मा फुले रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे. वाहन चालकांनी पंडित नेहरू रोडवरील व इतर रोडवरील पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करावीत.

पर्यायी मार्ग

१. संत कबीर चौक बाजून येऊन रामोशी गेट चौकाकडून भवानी माता रस्त्याने जाणाऱ्या वाहन-चालकांची ए.डी. कॅम्प चौकातून डावीकडे वळून भारत सिनेमा पद्मजी चौकी येथून उजवीकडे वळून जुना मोटार स्टॅण्डपर्यंत येऊन इच्छित स्थळी जावे.
२. ढोले पाटील चौक बाजूने येऊन रामोशी गेट चौकीसमोरील भवानी माता मंदिर रस्त्यावरून जुना मोटार स्टॅण्डकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी भगवान बाहुबली चौकातून जुना मोटार स्टॅण्डकडे जावे.
३. रामोशी गेट येथून जाणारी पीएमपी बसेसची वाहतूक सेव्हन लव्ह चौक येथून डावीकडे वळून गोळीबार मैदान चौक, डावीकडे वळून खाणेमारुती चौक अशी सुरू राहिल. जेणेकरून नवरात्र उत्सवादरम्यान भवानी माता मंदिर या भागात वाहतूककोंडी होणार नाही.
४. सेव्हन लव्ह चौकातून येणारी वाहतूक गोळीबार मैदानाकडे वळविण्यात यावी. मालधक्का चौकाकडून येणारी वाहतूक आरटीओ-पुणे स्टेशन-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी वळवण्यात यावी. बोल्हाई चौकातून जाणारी वाहतूक मालधक्का चौक येथे वळवण्यात यावी.

तांबडी जोगेश्वरी मंदिर
१. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिरदरम्यान जोगेश्वरी रस्त्यावर प्रवेश बंद
२. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरीदरम्यान तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे वळण घेणाऱ्या वाहनचालकांनी सरळ सेवासदन चौक उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने आप्पा बळवंत चौक उजवीकडे न वळता सरळ शनिवारवाडामार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.

पर्यायी मार्ग :
लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकात येऊन जोगेश्वरी मंदिराकडे वळण घेणाऱ्या वाहनचालकांनी सरळ सेवासदन चौक उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने आप्पा बळवंत चौक उजवीकडे न वळता सरळ शनिवारवाडामार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.

नो-पार्किंग
१. तांबडी जोगेश्वरी, ३३ बुधवार पेठ
२. अष्टभुजा देवी मंदिर, ४२४ शनिवार पेठ
३. अष्टभुजा दुर्गादेवी, ६२४, नारायण पेठ या ठिकाणी नवरात्रोत्सवातील १० दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता आवश्यकतेप्रमाणे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पार्किंग बंद करण्यात आली आहे तसेच यापूर्वी या रस्त्यांवर असणारी पार्किंग व्यवस्था नमूद कालावधीसाठी स्थगित करण्यात येत आहे.

वाहने पार्क करण्यासाठी…
१. टिळक पूल ते भिडे पूलदरम्यानचे नदीपात्रावरील रस्त्यावर
२. मंडई येथील मिनर्व्हा व आर्यन / कै. सतीश मिसाळ पार्किंग तळावर
३. या भागातील रस्त्यांवरील पार्किंग झोनमध्ये
४. चतु:श्रृंगी माता मंदिर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.