नौपाडा परिसरातील डॉ. मुस रोड ते – शंका ज्वेलर्स व देवा शर्टसच्या मार्गावर दिवाळी पहाट कार्यक्रमामुळे 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 06.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे.
(हेही वाचा – ठाणेकरांनो! दिवाळीच्या निमित्ताने शहरात असा होणार वाहतुकीत बदल)
असे असणार वाहतूकीतील बदल
- प्रवेश बंद : डॉ. मुस चौकाकडून गडकरी सर्कलच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉ. मुस चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग : सदरची वाहने डॉ. मुस चौकातून सरळ टॉवर नाका टेंभीनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
2. प्रवेश बंद : गडकरी रंगायतन जवळील सर्कल कडून डॉ. मुस चौकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गडकरी सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग : सदरची वाहने गडकरी सर्कल येथून अल्मेडा चौक-वंदना टी पॉईट- गजानन चौक-तीन पेट्रोल पंप- हरीनिवास सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
3. प्रवेश बंद : घंटाळी साईनाथ चौकाकडून गाडगीळ चौकाचे दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना श्रध्दा वडापाव, घंटाळी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग : सदरची वाहने घंटाळी चौकातून घंटाळी देवी पथ मार्गे इच्छित स्थळी जातील.
4. प्रवेश बंद : गजानन चौक ते तीन पेट्रोल पंप या सावरकर रोड वरील काका सोहनी पथ या गल्लीतून गाडगीळ चौकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग : सदरची वाहने तीन पेट्रोल पंप-हरीनिवास सर्कल मार्गे अथवा घंटाळी रोडने इच्छित स्थळी जातील.
5. प्रवेश बंद : राजमाता वडापाव सेंटरकडून गजानन महाराज चौकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना राजमाता वडापाव सेंटर येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग : सदरची वाहने राजमाता वडापाव सेंटर येथून गोखले रोडने इच्छित स्थळी जातील.
फायरब्रिगेड, रूग्णवाहिका, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हा बदल लागू राहणार नाही, असे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.
Join Our WhatsApp Community