दिवाळी पहाटच्या निमित्ताने ठाण्यातील (Thane) नौपाडा, राम मारुती रोड आणि मासुंदा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता रविवार, १२ नोव्हेंबर रोजी या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी मासुंदा तलाव आणि राम मारुती रोड परिसरात रंगमंच उभारून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा जांभळी नाका येथील चिंतामणी चौक सर्कल, राजावंत ज्वेलर्ससमोर, न्यू इंग्लिश शाळेजवळ, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स चौक आणि शिवाप्रसाद उपहारगृहाजवळ सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे वाहतूक शाखेने जाहिर केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचा मेल पाठवणाऱ्याला तेलंगणामधून अटक )
प्रवाशांनी कोणत्या रस्त्यांचा वापर करावा ?
– डॉ. मूस चौक येथून गडकरी सर्कलच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना डॉ. मूस चौक येथे प्रवेशबंदी. ही वाहने टॉवर नाका, टेंभी नाका मार्गे जातील.
– गडकरी सर्कलकडून डॉ. मूस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी. ही वाहने गडकरी सर्कल येथून अल्मेडा चौक, वंदना टी पॉईंट, गजानन चौक, तीन पेट्रोल पंप, हरिनिवासमार्गे जातील.
– घंटाळी साईनाथ चौक येथून पु. ना. गाडगीळ चौकाकडे येणाऱ्या वाहनांना श्रद्धा वडापाव दुकानाजवळ प्रवेशबंदी ही वाहने घंटाळी देवी पथमार्गे पुढे जातील.
– गजानन महाराज चौक ते तीन पेट्रोल पंप रस्त्यावर काका सोहनी पथ गल्लीतून पु. ना. गाडगीळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी. ही वाहने तीन पेट्रोल पंप, हरिनिवास मार्गे जातील राजमाता वडापाव सेंटर येथून गजाजन महाराज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी. ही वाहने गोखले रोडवरून पुढे जातील.
संबधित वाहतूक बदल रविवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत अंमलात राहणार असून या बदलांमधून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आल्याचे ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.
हेही पहा –