परशुराम घाटात दरड रस्त्यावर; मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

172

मुंबई- गोवा महामार्गावरुन प्रवास करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परशुराम घाटात दरड रस्त्यावर आल्याने मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे. मात्र, अद्याप तरी वाहतूक सुरळित झालेली नाही. घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, आता महामार्गावरील दरड हटवण्याचे काम सुरु आहे. वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत.

( हेही वाचा: राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर; अनेक विद्यापीठांच्या परीक्षा स्थगित )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.