गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील चांदणी चौकातला पूल पाडण्याची चर्चा सुरू होती. अखेर हा पूल जमीनदोस्त करण्यात आला आहे. यानंतर देखील चांदणी चौकातला पूल परिसर पुन्हा चर्चेत येत आहे. कारण दररोज येथील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
आजपासून म्हणजेच 10 ऑक्टोबरपासून पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक अर्धा तास बंद ठेवण्यात येणार आहे. मध्यरात्री 12.30 ते 1 पर्यंत या वेळेत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंचे खडक फोडण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना रात्रीच्या वेळेस प्रवास करताना काळजी घ्यावी लागणार आहे. पूल पाडला त्या ठिकाणी साताऱ्याहून मुंबईकडे जाण्यासाठी तीन लेन आहेत. तर मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जाण्यासाठी चार लेन आहेत.
(हेही वाचा – राणा म्हणताय, “…म्हणून श्रीरामांनीच उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला”)
मिळालेल्या माहितीनुसार, साधारण 8 ते 10 दिवस दररोज अर्धा तास चांदणी चौक परिसरातील वाहतूक बंद असणार आहे. दरम्यान, वाहतुकीस अडथळा ठरत असलेला चांदणी चौकातील पूल 2 ऑक्टोबर रोजी पाडण्यात आलेला होता.
Join Our WhatsApp Community