मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लागल्या रांगा

Traffic jam on Mumbai-Agra highway
मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लागल्या रांगा

मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरीच्या जवळ पिंप्री फाटा ते तळेगाव फाटा दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली आहे. पिंप्री फाटा या ठिकाणी कंटेनर बंद पडल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे समजते. यामुळे दीड किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामध्ये मोठी भर पडणार असल्याची शक्यता आहे.

या ठिकाणी रस्त्यासह उड्डाणपूल, समृद्धी महामार्ग यांचे काम सुरू असल्याने आधीच वाहने कोंडीत सापडतात. त्यातल्या त्यात अवकाळी पावसाचे वातावरण आणि थोडा झालेला पाऊस यामुळे अधिक समस्या उभ्या आहेत. वाहन चालक लवकर जायच्या नादात कुठल्याही दिशेने वाहने चालवत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्व्हिस रोड वरून अवजड वाहने नेल्याने सर्व्हिस रोडवरही वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्ग पोलीस केंद्र घोटीचे कर्मचारी गेल्या दीड तासांपासून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत आहेत.

(हेही वाचा – मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी; वसई- विरारमध्येही मध्यरात्री पावसाच्या सरी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here