खेडजवळील भोस्ते घाटात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या चौपदरीकरणासाठी घाटात सुरुंग लावण्यात आले होते. या सुरुंगाचा स्फोट झाल्याने दरड रस्त्यावर कोसळली त्यामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
वाहतूक खोळंबली
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लावलेल्या सुरुंगाच्या स्फोटामुळे दरड रस्त्यावर आल्याने, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खेड तालुक्यातील भोस्ते घाटात ठप्प झाली आहे. खेडजवळील भोस्ते घाटात सुरुंग लावण्यात आला होता. त्यामुळे दरड कोसळली. त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे. वाहतूक ठप्प झाल्याने, मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
(हेही वाचा: धक्कादायक! युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांचा ढाल म्हणून करतेय वापर! )
रस्त्यावर मातीचा ढिगारा
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. खेडजवळील भोस्ते घाटात सध्या रुंदीकरणाचे काम वेग घेत असताना, बुधवारी दुपारी घाटातील डोंगर फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आला होता. या सुरुंगाने घाटातील दरड कोसळून त्याची माती रस्त्यावर आली आणि त्यामुळेच हा महामार्ग ठप्प झाला. रस्त्यावर मातीचा मोठा ढिगारा आहे.
Join Our WhatsApp Community