Mumbai-Goa highway वर वाहतूक कोंडी; ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; प्रवासी ताटकळले

104

गोवा (Goa) आणि कोकणात निघालेल्या पर्यटकांना मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) सामना करावा लागत आहेत. माणगाव बाजारपेठ (Mangaon market) परिसरात ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच माणगाव बाजारपेठेच्या दुतर्फा पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. (Mumbai-Goa highway)

(हेही वाचा – पुण्यात Bangladeshi infiltrators च्या हद्दपारीसाठी हिंदू संघटनांचा विराट मोर्चा)

मुंबई आणि कोकणात जाणारे पर्यटक, प्रवासी माणगावमध्ये वाहतुक कोंडीत अडकले आहेत. अलिबाग ते वडखळ मार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तीनविरा ते पोयनाड पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या लेनवरसुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अलिबाग, मुरुडला फिरायला आलेले पर्यटक (Tourists) परतीच्या मार्गावर दिसून येत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.