गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जाण्यास निघाल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात वाहनांची मोठी रांग लागली आहे. अमृतांजन पुलाजवळ सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
( हेही वाचा : Post Office Scheme : पोस्टाच्या योजनेत ३३३ रुपये गुंतवा १६ लाखांपर्यंत परतावा मिळवा)
वाहनांच्या रांगा
मुंबई-पुण्यातून चाकरमानी वर्ग मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होतो. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमाफीची घोषणा केल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
ट्राफिक ब्लॉक
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ ( मुंबई दिशेने ) ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्यावतीने शुक्रवारी २६ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात आले. या कामासाठी दुपारी १२ ते २ या कालावधीत महामार्गावर ब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉक दरम्यान एक्स्प्रेस वे वरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community