लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे अनेकजण गावी किंवा फिरण्यासाठी बाहेर जातात. यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांच्या लांबच लांबच रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूर टोलनाका आणि बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. लागोपाठ सुट्ट्या आणि वीकेंड असल्यामुळे अनेकजण घराबाहेर पडतात. या मार्गाने कोल्हापूर मार्गे कोकणात सुद्धा जाता येते त्यामुळे बोरघाटात अम्रुतांजन पुलापासून दोन्ही बाजूला २ ते ३ किमीच्या रांगा लागल्या आहेत. एक्सप्रेस मार्गावर गाड्या धीम्या गतीने पुढे सरकत आहेत.
दरम्यान, जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पर्यटकांसह स्थानितकांसुद्धा या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
Join Our WhatsApp Community