सायन-पनवेल महामार्गावर (Sion-Panvel Highway) आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic jam) झाली आहे. काला रात्री ११ वाजल्यापासून सुरू झालेला पनवेल ते बेलापूरदरम्यानच्या मेगाब्लॉकमुळे (Megablock) अनेक हार्बर तसेच मध्य रेल्वेचे अनेक प्रवासी गैरसोय टाळण्यासाठी वाहनाने प्रवास करत आहेत. रविवारी नोकरीनिमित्त आणि महत्त्वाच्या कामानिमित्त ज्यांना घराबाहेर पडणे गरजेचे आहे, असे प्रवासीही वाहनाने प्रवास करत आहेत. त्यामुळे आज सकाळपासून सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रांगांचे दृष्य पाहायला मिळत आहे.
अनंत चतुदर्शीनंतर मिळालेली ईदची सुट्टी आणि त्यानंतर आलेला शनिवारी, रविवार. असे जोडून सुट्ट्यांचे दिवस आल्यामुळे या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांनीही गर्दी केली आहे. अनेक पर्यटक पुणे-कर्जत-मुंबई-गोवा महामार्गाच्या (Pune-Karjat-Mumbai-Goa highway) दिशेने प्रवास करतात. त्यामुळे नियमित प्रवास करणारे प्रवासी, पर्यटक आणि मेगाब्लॉकमुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर (Sion-Panvel Highway) वाहतूक कोंडी झाली आहे.
(हेही वाचा – Tamil Nadu Bus Accident : बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू )
नवी मुंबईतून जाणाऱ्या महामार्गावरील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पर्यटक आणि नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरू आहे.