पुणे-सातारा महामार्गावर रविवार, (९ जून) रोजी सकाळपासूनच मोठी वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन नसल्याने वाहनचालकांचे हाल होत आहे.
रविवारी सुट्टीमुळे मोठ्या संख्यने वाहन लक बाहेर पडतात. त्यामुळे सकाळपासूनच महामार्गावर वाहनांची गर्दी मोठ्या वाढतेय. यामुळे महामार्गावर शिवरे व खेड-शिवापूर येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुक शेजारील सेवा रस्त्याने वळवण्यात आली आहे या ठिकाणचा अरुंद रस्ता व त्यावर पडलेले खड्डे तसेच काल मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस यामुळे साठलेले पाणी या सर्व कारणाने अगोदरच संथ असलेली वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली आहे.
(हेही वाचा – Pankaja Munde यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी परळी बंदचे आवाहन, नेमकं काय झालं? जाणून घ्या…)
सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारावर नाही
त्यामुळे शिवापूरपासून वेळु, शिंदेवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत तसेच शिवरे येथून टोलनाक्यापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. सुट्टीच्या दिवशी दरवेळी वाढणारी वाहतूक नियंत्रीत करणे, रस्त्यामधील अडथळे दूर करणे हे रस्ता ठेकेदाराचे काम आहे; परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारावर काहीच कारवाई होत नाही, महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस काही वेळ थांबतात, मात्र ही समस्या नेहमीचीच असल्याने तेदेखील कंटाळून दुर्लक्ष करतात.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी धावपळ
वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्लम खतिब यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. सकाळी गुडघाभर पाणी रस्त्यावर होते. ठेकदाराला तातडीने रस्ता दुरुस्ती करावयास सांगितली तर त्याच्याकडे खड्डे बुजवण्यासाठी मटेरीअल नसल्याचे त्याने सांगितले आहे. वाहतूक पोलीसच रस्त्याच्या कडेला पडलेली खडी जेसीबीच्या सहाय्याने खड्डयात टाकून रस्ता वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूण ३ अधिकारी व १० कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी धावपळ करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community