मुंबईतील सहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना (Traffic Police Control Room Threat Call) मिळाला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश मिळाले आहेत. हा संदेश कोणी पाठवला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु पोलीस या प्रकरणाची चैकशी करत आहेत.
(हेही वाचा – Jharkhand political crisis : धुक्यामुळे आमदारांच्या विमानांचे उड्डाण रद्द)
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
एका अज्ञात व्यक्तीकडून वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला होता. संपूर्ण मुंबईत ६ ठिकाणी बॉम्बस्फोट (Traffic Police Control Room Threat Call) ठेवण्याचा मेसेज पाठवण्यात आल्याचे म्हटले आहे. या मेसेजनंतर मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
(हेही वाचा – One Avighna Park : ‘वन अविघ्न पार्क’च्या तळघरातील कचरा वर्गीकरण खोलीत सापडले मृत अर्भक)
Mumbai Traffic Police Control Room receives a threat message from an unknown person. The message states that bombs have been placed at six locations across Mumbai. Mumbai police and other agencies are alert after the message. Efforts are underway to trace the message sender:…
— ANI (@ANI) February 2, 2024
काय आहे संदेशात?
या संदेशात मुंबईतील सहा वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट (Traffic Police Control Room Threat Call) घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. हा संदेश गांभीर्याने घेत, पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचाही शोध घेतला जात आहे.
(हेही वाचा – Interim Budget 2024 : युपीएच्या काळातील अर्थव्यवस्थेची दुरवस्था श्वेतपत्रिकेतून मांडणार – अर्थमंत्री निर्मला सीतारामन)
मुंबई पोलिसांना यापूर्वीही धमक्या मिळाल्या आहेत
यापूर्वी ३१ डिसेंबर २०२३ रोजी पोलिसांना अशाच प्रकारचा धमकीचा कॉल आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहरात स्फोट होतील असे सांगितले. या कॉलनंतरही पोलीस सतर्क झाले आणि सर्व पोलीस ठाण्यांना आणि गुन्हे शाखेला सतर्क करण्यात आले. तथापि, तपासात नंतर असे उघड झाले की कोणीतरी बनावट कॉल करून विनोद करत होता. (Traffic Police Control Room Threat Call)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community