मुंबई उपनगरातील बेशिस्त रिक्षाचालकांची मुजोरी मुंबई वाहतूक विभागाने चांगलीच उतरवली, मुंबई पोलिसांच्या वाहतुक विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमे दरम्यान ५२ हजार रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) या कारवाईमुळे जवळचे भाडे नाकारणारे, तसेच बेशिस्त रिक्षाचालक चांगलेच धास्तावले आहे. (Traffic Police)
मुंबई उपनगरात रिक्षाचालकांची मुजोरी खूपच वाढली होती, जवळचे भाडे नाकारणे, विना बॅच विना गणवेश रिक्षा चालवणे, प्रवाशांसोबत बेशिस्तीने वागणे या सारख्या अनेक तक्रारी मुंबई वाहतूक विभागाकडे प्राप्त झालेल्या होत्या. या बेशिस्त रिक्षाचालकांची ही मुजोरी मोडीत काढण्यासाठी मुंबई वाहतूक विभागाने कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली होती. (Traffic Police)
(हेही वाचा – उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून Varsha Gaikwad यांची उमेदवारी जाहीर, याचसाठी केला होता नाराजी नाट्याचा प्रयोग)
करण्यात आली एवढी कारवाई
८ एप्रिल ते २२ एप्रिल या दरम्यान मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान मुंबई उपनगरातील ५२ हजार १८९ विविध शिर्षाखाली रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विशेषतः भाडे नाकारणे या शिर्षाखाली ३२ हजार ६५८, विना गणवेश ५ हजार २६८, जादा प्रवासी वाहतूक करणे ८ हजार ६५० व इतर कारवाई ५हजार ६१३ असे एकूण ५२१८९ ई-चलान कारवाई करण्यात आली आहे. त्याच बरोबर भाडे नाकारणाऱ्या ३२ हजार ६५८ वाहनांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Traffic Police)
मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून विशेष मोहिमेदरम्यान बेशिस्त, आणि मुजोर रिक्षाचालकांवर करण्यात आलेल्या या कारवाईचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले असून ही कारवाई मुंबईतील मुजोर टॅक्सीचालकांवर देखील करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे रिक्षा चालक चांगलेच धास्तावले आहे. (Traffic Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community