Traffic problem in Mahabaleshwar : महाबळेश्वर होणार इको हिल स्टेशन! खासगी वाहनांवर येणार बंदी?

132

महाबळेश्वर, पाचगणी येथे सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे एका बाजूला निसर्गरम्य असलेले हे ठिकाण आज वाढत्या वाहतूक कोंडीमुळे मात्र प्रदूषणाच्या विळख्यात अडकू लागले आहे. याला कारण आहे पर्यटक घेऊन येत असलेली खासगी वाहने. सीजनच्या वेळी या हिल स्टेशनमध्ये शेकडोंच्या संख्येने खासगी वाहने येऊन धडकतात आणि नियमांचे उल्लंघन करत पर्यटक येथे वाहने चालवत असतात. वाहने नियमबाह्यपणे पार्किंग करतात. त्यामुळे आता यासाठी येथील टॅक्सी चालक संघटनेने पुढाकार घेतला आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी येथील निसर्गसौंदर्य टिकून राहील, त्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव सध्या मंत्रालयात पर्यटन विभागाकडे पोहचला आहे.

(हेही वाचा १ लाख बळी घेणाऱ्या वादळाने हादरला होता ‘बॉम्बे’ इलाखा)

महाबळेश्वरमध्ये का होतेय वाहतूक कोंडी? 

राज्यातील, राज्याबाहेरील तसेच परदेशातील हजारो पर्यटक हे सीजनच्या वेळी कायम महाबळेश्वर आणि पाचगणी या हिल स्टेशनला पसंती देत असतात. या ठिकाणी येताना सोबत स्वतःच्या खासगी किंवा टुरिस्टच्या गाड्या घेऊन येतात. एरव्ही मुंबई, पुण्यासह अन्य शहरांत नियमांच्या चौकटीत राहून वाहने चालवणारे हे पर्यटक महाबळेश्वर येथे जेव्हा येतात, तेव्हा मात्र नियम धाब्यावर बसवून वाहने चालवत असतात. आधीच या ठिकाणचा रस्ता हा घाट रस्ता आहे. त्यामुळे तो पूर्वी ज्या रुंदीचा बनवला तो तितकाच राहणार आहे. त्यांची रुंदी वाढवणे शक्य नाही. असे असताना खासगी वाहन चालक या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करत असतात. रस्त्याचा मध्ये वाहने थांबवत असतात. विशेष म्हणजे पॉईंटच्या ठिकाणी वाहने अत्यंत विस्कळीतपणे उभी केली जात असतात. या सगळ्याचा परिणाम हा येथील वाहतुकीवर होतो. या ठिकाणी वाहतूक कोंडी इतकी वाढली आहे की, ७-८ किमी अंतर पार करण्यासाठी अनेकदा चक्क २-अडीच तास लागतात, असे महाबळेश्वर टॅक्सी युनियनचे अध्यक्ष यशवंत भिलारे ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलताना म्हणाले.

bhise 1

 

(हेही वाचा World Environment Day : जून महिन्यात तापमान झाले होते ५० डिग्री! भारतात १४०० जणांचा गेलेला बळी)

काय आहे प्रस्ताव?

  • महाबळेश्वर येथे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता महाबळेश्वर आणि पाचगणी येथील सर्व टॅक्सी संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी एक प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव त्यांनी महाबळेश्वर नगरपरिषदेला दिला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारच्या पर्यटन विभागापर्यंत पोहचला आहे. या प्रस्तावामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी येथे खासगी वाहने येतील आणि ती त्या त्या हॉटेलमध्येच उभी राहतील. तसेच या खासगी वाहनांसाठी एसटी स्टॅन्ड येथे मोठे पार्किंग उभारण्यात येईल. महाबळेश्वर आणि पाचगणी फिरण्यासाठी पर्यटक येथील स्थानिक टॅक्सी भाड्याने घेतील. या ठिकाणच्या सर्व पॉइंटवर ही खासगी वाहने जाणार नाहीत, तिथे फक्त स्थानिक टॅक्सी जातील, या सर्व टॅक्सी इलेक्ट्रिक असतील.
  • स्थानिक टॅक्सीचे रूपांतर इलेट्रीक टॅक्सीमध्ये रूपांतरित करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. याकरता इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारने आवाहन करावे. इंधनावर चालणाऱ्या सध्याच्या टॅक्सी मालकांना इलेक्ट्रिक टॅक्सीसाठी महाबळेश्वर नगरपरिषद २ लाख रुपयांचे अनुदान देईल आणि राज्य सरकार २ लाख रुपये देईल. त्यामुळे १३ लाख रुपये किमतीची टॅक्सी त्यांना ८ ते ९ लाख रुपयांत उपलब्ध होईल. तसेच ७ वर्षांपेक्षा कमी आयुर्मान असलेल्या वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्यात येईल, त्याकरता या कंपन्या अनुदान देतील. अशा प्रकारे या ठिकाणी पर्यटकांना महाबळेश्वर, पाचगणीत सर्व पॉईंटकडे या इलेक्ट्रिक टॅक्सी घेऊन जातील, त्यामुळे वाहतूक कोंडी संपेल आणि इलेक्ट्रिक टॅक्सीमुळे प्रदूषण होणार नाही. पर्यावरणाचे संवर्धन होईल.

(हेही वाचा IIT कडे केली पाठ, तरी जगात मान ताठ! मुकेश अंबानींसह देशातील १० गर्भश्रीमंतांची गोष्ट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.