मालाड पश्चिमेची अनेक वर्षांची ही समस्या आता होणार दूर : महापालिकेने उचलले हे महत्वाचे पाऊल

मालाड पश्चिम रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यांसह स्थानकासमोरील पदपथही काही दुकानदारांनी अडवून ठेवल्याने मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. स्थानकासमोरील अतिक्रमणामुळे वाहनांना चालण्यासाठी रस्ता नाही की पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ नाही. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मालाडकरांच्या मनात असंतोष खदखद असून अखेर महापालिकेने मालाडमधील जनतेची या समस्येतून सुटका करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अतिक्रमणात अग्रेसर असलेल्या एम एम मिठाईसह सर्वंच अतिक्रमणे हटवून मालाड स्थानकांचा विळखा सोडतवतानाच वाहतूक कोंडीतूनही सुटका करण्याचा प्रयत्न केला आहे.

( हेही वाचा : सरकारची रसद पोहोचलीच नाही; महानंद डेअरीला उर्जितावस्था मिळणार कशी?)

मालाड पी उत्तर महापालिका विभागाच्यावतीने मंगळवारी मालाड पश्चिम येथील आनंद रोड, स्टेशन रोडवरील २७ दुकाने आणि बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. यासर्व दुकान आणि बांधकामांनी अतिक्रमण केल्याने याठिकाणी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांसह खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत होती.ही समस्या मागील अनेक वर्षांपासून मालाड रेल्वे स्थानक मोकळा करण्यासाठी ही अतिक्रमणे हटवणे आवश्यक असल्याने पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यासह आनंद रोडवरील ही दुकानांची वाढीव बांधकामे तोडून येथील परिसर मोकळा केला, तसेच स्थानकाच्या समोरील एमएम मिठाईवाला या दुकानांनेही पदपथ अतिक्रमित केल्याने पादचाऱ्यांना चालण्यास पदपथ नसल्याने तसेच याठिकाणी मोठ्याप्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या दुकानासह इतर दुकानांनाही महापालिकेच्या पी उत्तर विभगाच्यावतीने नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे स्थानकासमोरील पदपथांवर दुकानदारांनी केलेले अतिक्रमणही तोडून पादचाऱ्यांना पदपथ मोकळा करून दिला जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मालाड पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह सहायक अभियंता प्रविण मुळक, दुय्यम अभियंता आनंद नेरुरकर, आनंद जाधव, कनिष्ठ अभियंता मयुर भांडे, परवाना निरिक्षक सुरेश भंडारे, प्रदीप देवारे आणि अतिक्रमण निर्मुलन विभागाचे निरिक्षक साळोखे आदींनी संयुक्तपणे ही कारवाई करून मालाडकरांची अनेक दिवसांची समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मालाडमध्ये मंगळवारी पहिल्या टप्प्यात २७ दुकानांची वाढीव बांधकामे इतर दुकानांवर कारवाई केल्यामुळे मालाडमधील जनतेने याचे स्वागत केले असून ही कारवाई अधिक तीव्र करून स्टेशन परिसर ते स्टेशन मार्ग पूर्णपणे अतिक्रमण मुक्त केला जावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here